एक थेंब त्याचा ओला
थेंब थेंबा मागुनी आला
झंकारली सतार हृदयात
पाऊस पाहुनी घन विभोर
मयूर पंखांचेही झाले गीत
थेंब ओघळताना पाहून
तुझी आठवते हनुवटी ओली
आम्र वृक्षाला कवळून
लगटली सायलीची वेली
कोवळ्या उन्हात पावसाला
वाटते मीच इंद्र धनु व्हावे
त्या थेंबांच्या हिंदोळ्या वरून
सप्तरंग होऊन जावे
पाऊस थांबतो जरासा
माळरानी सुस्तावतो
कात टाकलेल्या नागीणीला
थेंब थेंबी भिजवतो
पाऊस जातो त्याच्या घरी
पानोपानी होते हिरवाई
टपोऱ्या थेम्बांवर लोलक
गातात जलतरंग अंगाई
सोनाली जोशी लिखितकर