Monday, March 7, 2011

मी आजची माता............


मी आजची माता............

परवा सहज मनी आला विचार
त्या विचाराने मला ,केले फार बेजार,
मुलांना माझ्या लागलंय कॉम्पुटरचे  वेड
न्याहारीला हवाय फक्त बटर आणि ब्रेड||

रविवारी संध्याकाळी , हवाय पिझा आणि बर्गर
मेक डोनाल्ड ,पिझा हटने केलंय मला जर्जर
टी.व्ही .,कॉम्पुटरच्या  उरल्या वेळात ,मुले करतात अभ्यास
अर्ध्या तासात त्यांचा अभ्यास  होतो खलास

आई म्हणाली  माझी  ,त्यांच्या वेळी नव्हती अशी चैन
नव्हता घरात साधा पंखा,  होते चिमण्या आणि कंदील ,
लाड अजिबात नव्हते, माय बाप देवासमान
म्हणुन सर्व मुले झाली इंजिनिअर ,डॉक्टर छान

मी विचार केला ,मुलांना मी फार सोडलाय सैल
म्हणूनच तर  अभ्यासात होऊ लागलीयत बैल
एक दिवस सोडलं ,मी घरात फर्मान
आजपासून बंद बर्गर पिझा ,घरीच जेऊ छान

कॉम्पुटरला हात लावायचा नाही कुणी
टी .व्ही. बघायचा थोडा वेळ ,खेळायची भेंड्या गाणी
गम्मत म्हणुन एक दिवस, तर लाईटही बंद केले
मेणबत्तीच्या प्रकाशात मुलांना धडे शिकवले

मुले बिचारी घाबरली ,कावरी बावरी झाली
डासांनी तर आमची मेजवानीच उडवली
हात पाय लाल झाले ,अंधारात अडखळून पडले
मुलांना व्यस्त ठेवता ठेवता ,डोके गरगरू लागले

रोज रोज स्वयंपाक करून मी खूप थकून गेले
आई मी काय करू ? ऐकून ऐकून वेडी झाले
शेवटी एक दिवस मी पत्करली शरणागती
सर्व नियम सोडून ,मुलांना घेऊन गेलो पिझा हटी......

सोनाली जोशी लिखितकर

धुंद





धुंद  ढगाळ  पडली  हवा,  धुंदीत  माझे  चालणे

 धुंदीत  बोल बोलताना,  खुदकन  स्वतःशीच  हसणे

 चंद्राच्या  रात्रीत  माझ्या , जसे  तुझ्या  सवे  चालणे

 आठवत  राहते  सारखे,  तुझा  हात  हातात  धरणे ||
 
 नि:शब्द  शब्द  बोलताना , ओठांचेच  अडखळणे

 स्वप्नांच्या   हिंदोळ्यावर , जसे  नील पक्षाचे  झुलणे

 काळवेळ  माणसांचा  मला  विसर  पडतो  आहे

  मागे  मागे  खूप  मागे,  माझे  वय  गेले  आहे ||

 सांग सखे  बोल  सखे , काय  बोलायचे  आहे ?

 किती  वेळा  विचारशील  मला?  तुला  काय  ऐकायचे  आहे?

 दोघे  दोघे  जेव्हा  होतात  एक , तेव्हा  बोलण्या  सारखे  नाही  राहत

 स्पर्श  हाताचा  स्निग्ध  उष्ण , सांगून  जातो  लगेच  तत्क्षण ||

 एक   मात्र  आहे  आता,  एक  विश्वास  मनी  आहे

 माझ्या  करता  एक  तरी , आज  अजून  तेथे  आहे .

 माझ्या करता एक तरी आज अजून तेथे आहे.||

सोनाली जोशी लिखीतकर 




<