धुंद ढगाळ पडली हवा, धुंदीत माझे चालणे
धुंदीत बोल बोलताना, खुदकन स्वतःशीच हसणे
चंद्राच्या रात्रीत माझ्या , जसे तुझ्या सवे चालणे
आठवत राहते सारखे, तुझा हात हातात धरणे ||
नि:शब्द शब्द बोलताना , ओठांचेच अडखळणे
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर , जसे नील पक्षाचे झुलणे
काळवेळ माणसांचा मला विसर पडतो आहे
मागे मागे खूप मागे, माझे वय गेले आहे ||
सांग सखे बोल सखे , काय बोलायचे आहे ?
किती वेळा विचारशील मला? तुला काय ऐकायचे आहे?
दोघे दोघे जेव्हा होतात एक , तेव्हा बोलण्या सारखे नाही राहत
स्पर्श हाताचा स्निग्ध उष्ण , सांगून जातो लगेच तत्क्षण ||
एक मात्र आहे आता, एक विश्वास मनी आहे
माझ्या करता एक तरी , आज अजून तेथे आहे .
माझ्या करता एक तरी आज अजून तेथे आहे.||
सोनाली जोशी लिखीतकर
<
No comments:
Post a Comment