Friday, May 20, 2011

भरून आलं आभाळ ...

भरून आलं आभाळ ...
 
काल दुपारी अचानक आभाळ भरून आलं.
मातीचा मृद गंध मनामध्ये भरून गेलं
पाऊस सुद्धा थोडा थोडा तेव्हा पडत होता
मनालाही तेवढाच आधार पुरेसा होता
काय माहिती कसे आहे ,पण पावसाचे आणि आठवणींचे नाते मात्र जुने आहे
 
तेव्हा सुद्धा आभाळ भरून आलं होत
पाऊस तिला बिलगला तेव्हा मन वेड झाल होत
पावसाचा त्या वेळी हेवा वाटला होता
पण छत्री तिला देऊन मी मोका साधला होता
काय माहिती कस आहे पण पावसाचे आणि छत्रीचे नात सुद्धा जुनं आहे
 
छत्री परत देताना ती रुमाल विसरली होती
मी रुमाल परत करताना सोबत चहा प्यायली होती
चहा पिताना म्हणली आता नंतरचा चहा मी देणार
यातच कळला मला, तिने मला दिला होता होकार
काय माहिती काय आहे पण चहाचे आणि मैत्रीचे नाते मात्र जुने आहे
 
चहा पिताना एकदा म्हणली तू खूप छान आहेस
तुझे वागणे सुद्धा आरशासारखे लखलखीत आहे
माझ्या वडिलांना  सुद्धा असाच  हवाय जावई
चालेल पुण्यातला किंवा चालेल सुद्धा मुंबई
काय माहिती काय आहे पण मुंबई पुण्याचा जावई सासर्याना नेहमीच  हवा आहे
 
खूप दिवस प्यालो चहा पण आमची गाडी मात्र जाईना पुढे
काय विचारू कसे विचारू ,जाईना  पुढे  आमचे घोडे
एक दिवस धीर करून तिला विचारीन म्हणले
तर तीच आधी म्हणाली तुझ्यासारखे मित्र असतात थोडे
काय माहिती काय आहे ,पण तुझे माझे नाते मात्र वेगळे आहे
 
काल मी पहिला आहे एक मुलगा
आई वडिलांना सुद्धा तो पसंत आहे बर का
मला पण वाटतोय नवरा म्हणुन बरा
नोकरी आहे कायम ,घर आणि पैसा .
काय माहित काय आहे पण ही आपली शेवटची भेट आहे
 
अजून मला आठवतेय ती भेट
अजून मला आठवतोय तो पाऊस
तेव्हा सुद्धा तो पडताच होता
माझ्या डोळ्यातले अश्रू स्वतःत मिसळत होता
काय माहिती काय आहे पण पावसाचे आणि दुःखाचे नाते मात्र जुने आहे .
 
सोनाली जोशी लिखितकर  .
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment