Monday, January 31, 2011

तुझ्या येण्यान होतं

तुझ्या येण्यान होतं  
मन बावरं  बावरं,
जशी वाऱ्यावर जाते
उडुनी सावर सावर ...
तुझ्या बोलण्याचा गुंजारव 
मी होते कमला पंकज,
स्पर्श होइल कधी तुझा 
आधीच होते लाजाळूच  पान.....
पाहशील मला चोरुनी 
म्हणुनी आधी  मिटले  नयन ,
स्वप्नात  कवळशील म्हणुनी
निद्राही दिली सोडून  ......
तू आलास भेटाया
तर जाशी एकटीला सोडून,
म्हणुनी भेटत नाही तुला
राहते मनातच केवळ तुझे  ध्यान ........
सोनाली जोशी लिखितकर
 

Thursday, January 27, 2011

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी
जागवून माझिया मनी, आकाश तारकांचा शृंगार
प्रेमाचे घातलेस  हृदयी ,अनामिक तू हुंकार
तुझा शब्द ऐकण्यासाठी ,तरसवले मला फार
तुझ्या सवे वाहून नेले, जशी सागराला भारती अपार||
तू सागर होता, मी  झाले चंद्र
तू सागर होता ,मी झाले सरिता
चंद्र होऊनी  पृथ्वी जवळी आले
सरिता होऊनी स्वतःस मिटविले ||
नाही राहिले माझे काही, आता जिवा पार
अशात कसे रे ,दूर केले मला वारंवार
इतके सोपे असते का रे ,येऊनि  जाणे दूर
कुणाच्याही हृदयाला करणे एक चीर ||
काय करू आता जगण्यास अर्थ नाही
कशात ,कुणात आता, रसच वाटत नाही
आहे मनामध्ये माझ्या, धगधगती एक ज्वाला
पण राहीन तुझ्या मंदिराबाहेरी ,बनून दीप माला
..........................बनुनी दीप माला
सोनाली जोशी लिखितकर

Tuesday, January 25, 2011

पाऊल टाकू पुढे

पाऊल टाकू पुढे
आज टाकले पुन्हा एकदा माझे पाऊल पुढे .
पुरंदरच्या शिवदुर्गावर ,भवताली सह्याद्रीचे कडे
किती दिसांची आस मनी ,पाहावा हा किल्ला
किती गेले रविवार सांगू ,जाणे होईना मला 1.
चढू लागले धापा टाकत किल्याची अवघड वाट  
कधी टोचली मज करवंदीची जाळी घनदाट, 
कधी घसरले पाऊल कधी खरचटले कोपर
तेव्हा  दिसले महाद्वार किल्याच्या बाहेर.
मन माझे थर थरू लागले  पायांच्या बरोबरी
पोचले शिवरायांच्या काळात मी तत्परी,
असेन का मी एखादा मावळा मराठी तरी
की असेन एखादा नोकर  राजांच्या खातिरदारी.
कधीतरी  पडले असेल का  माझे पाऊल या  दगडावरी  
जरी  नसेल यातील कुणी तरी नक्कीच असेन राजांचा श्वान,
टाकुनी उडी चितेत त्यांच्या माझ्या कुळाचा वाढवीत मान
घुमली  असतील इथेच बाजीप्रभूंचे तलवारींचे खण खण  
जेव्हा स्वराज्याकरिता त्यांनी सोडले पावनखिंडीत प्राण 
विचारा मध्ये गुंगून गेले ,अंगामध्ये  चढले स्फुरण
पण आता मी काय करणार , कुणाविरुद्ध पुकारू रण
धारदार करारी आला आवाज शांती भेदून
बाळा अजूनही नाही मिळाले स्वराज्य आपणा
अतिरेकी ,भ्रष्टाचारी आता आहेत आपल्याला वेढुन
उभी ठाक या सर्वाशी लढाया कंबर कसून 
सर्व मित्रमैत्रिणीना दे   या साठी आमंत्रण 

Monday, January 24, 2011

अबोला

अबोला
तु का अबोल इतका आज
का आज सख्या इतका शांत तू
कि आतून ढवळून निघालास   तू
म्हणून हे कोशात जाऊन  बसलास तू
रित्या मनात दुसरे काही भरेना 
खरेच आज तुझ्या विना करमेना 
वाट पाहून तुझ्या निरोपाची
कशातही  मन लागेना
जेवण लागेना गोड
काम हाताचे जसे यंत्र-जोड
आज का रागावला मित्र
निदान यावे एखादे पत्र
मी त्याची काढावी समजूत
आणि काढताना ती रागवावे स्वतःच
आता फक्त एक उपाय
त्याची पहावी मी वाट
पण हे फार अवघड असते
क्षणाक्षणाने जळणे असते