फक्त तुझ्यासाठी
जागवून माझिया मनी, आकाश तारकांचा शृंगार
प्रेमाचे घातलेस हृदयी ,अनामिक तू हुंकार
तुझा शब्द ऐकण्यासाठी ,तरसवले मला फार
तुझ्या सवे वाहून नेले, जशी सागराला भारती अपार||
तू सागर होता, मी झाले चंद्र
तू सागर होता ,मी झाले सरिता
चंद्र होऊनी पृथ्वी जवळी आले
सरिता होऊनी स्वतःस मिटविले ||
नाही राहिले माझे काही, आता जिवा पार
अशात कसे रे ,दूर केले मला वारंवार
इतके सोपे असते का रे ,येऊनि जाणे दूर
कुणाच्याही हृदयाला करणे एक चीर ||
काय करू आता जगण्यास अर्थ नाही
कशात ,कुणात आता, रसच वाटत नाही
आहे मनामध्ये माझ्या, धगधगती एक ज्वाला
पण राहीन तुझ्या मंदिराबाहेरी ,बनून दीप माला
..........................बनुनी दीप माला
सोनाली जोशी लिखितकर
जागवून माझिया मनी, आकाश तारकांचा शृंगार
प्रेमाचे घातलेस हृदयी ,अनामिक तू हुंकार
तुझा शब्द ऐकण्यासाठी ,तरसवले मला फार
तुझ्या सवे वाहून नेले, जशी सागराला भारती अपार||
तू सागर होता, मी झाले चंद्र
तू सागर होता ,मी झाले सरिता
चंद्र होऊनी पृथ्वी जवळी आले
सरिता होऊनी स्वतःस मिटविले ||
नाही राहिले माझे काही, आता जिवा पार
अशात कसे रे ,दूर केले मला वारंवार
इतके सोपे असते का रे ,येऊनि जाणे दूर
कुणाच्याही हृदयाला करणे एक चीर ||
काय करू आता जगण्यास अर्थ नाही
कशात ,कुणात आता, रसच वाटत नाही
आहे मनामध्ये माझ्या, धगधगती एक ज्वाला
पण राहीन तुझ्या मंदिराबाहेरी ,बनून दीप माला
..........................बनुनी दीप माला
सोनाली जोशी लिखितकर
No comments:
Post a Comment