पाऊल टाकू पुढे
आज टाकले पुन्हा एकदा माझे पाऊल पुढे .
पुरंदरच्या शिवदुर्गावर ,भवताली सह्याद्रीचे कडे
किती दिसांची आस मनी ,पाहावा हा किल्ला
किती गेले रविवार सांगू ,जाणे होईना मला 1.
चढू लागले धापा टाकत किल्याची अवघड वाट
कधी टोचली मज करवंदीची जाळी घनदाट,
कधी घसरले पाऊल कधी खरचटले कोपर
तेव्हा दिसले महाद्वार किल्याच्या बाहेर.
मन माझे थर थरू लागले पायांच्या बरोबरी
पोचले शिवरायांच्या काळात मी तत्परी,
असेन का मी एखादा मावळा मराठी तरी
की असेन एखादा नोकर राजांच्या खातिरदारी.
कधीतरी पडले असेल का माझे पाऊल या दगडावरी
जरी नसेल यातील कुणी तरी नक्कीच असेन राजांचा श्वान,
टाकुनी उडी चितेत त्यांच्या माझ्या कुळाचा वाढवीत मान
घुमली असतील इथेच बाजीप्रभूंचे तलवारींचे खण खण
जेव्हा स्वराज्याकरिता त्यांनी सोडले पावनखिंडीत प्राण
विचारा मध्ये गुंगून गेले ,अंगामध्ये चढले स्फुरण
पण आता मी काय करणार , कुणाविरुद्ध पुकारू रण
धारदार करारी आला आवाज शांती भेदून
बाळा अजूनही नाही मिळाले स्वराज्य आपणा
अतिरेकी ,भ्रष्टाचारी आता आहेत आपल्याला वेढुन
उभी ठाक या सर्वाशी लढाया कंबर कसून
सर्व मित्रमैत्रिणीना दे या साठी आमंत्रण
No comments:
Post a Comment