अबोला
तु का अबोल इतका आज
का आज सख्या इतका शांत तू
कि आतून ढवळून निघालास तू
म्हणून हे कोशात जाऊन बसलास तू
रित्या मनात दुसरे काही भरेना
खरेच आज तुझ्या विना करमेना
वाट पाहून तुझ्या निरोपाची
कशातही मन लागेना
जेवण लागेना गोड
काम हाताचे जसे यंत्र-जोड
आज का रागावला मित्र
निदान यावे एखादे पत्र
मी त्याची काढावी समजूत
आणि काढताना ती रागवावे स्वतःच
आता फक्त एक उपाय
त्याची पहावी मी वाट
पण हे फार अवघड असते
क्षणाक्षणाने जळणे असते
No comments:
Post a Comment