माझ्या कृष्णा
तू माझा फक्त ना रे
किंवा मला तरी तुझी म्हण ना,
रोज एकदा तरी माझा
हात हातात घेना.
तुझ्या मुलायम पिताम्बराचा
एकदा तरी स्पर्श होऊ दे ना,
कुठे तरी जाताना मला एकदा
सोबतीला तरी घे ना .
मीच तुझी सारखी आठवण काढते
तू माझी एकदा तरी काढ ना ,
हो तुला खूप आहेत कामे
माझ्या हून खूप प्रेम करणारे भक्त आहेत रिकामे .
तुझे आणि त्यांचे भक्तीचे,
हितगुज सारखे चालते .
पण मग एकदा तरी आर्त प्रेम करणारीला
तुझे मन काय म्हणते .
रोज रोज अशी त्याच्यावर
मी फक्त रागवतच असे ,
स्वप्नध्यानामध्ये मात्र
त्याच्या जवळ जवळ असे.
वाटे मी कस्पट माझे ते प्रेम काय
उगीचच स्वतःच्या प्रेमाचा
मी वाजवला डंका
अशीच हळूच खिन्न होत,
पाहू लागले तुझे रूप
तर काय ........
तो म्हणाला आज तुझी आठवण आली खूप
तुझ्या लाडेलाडे रागामध्ये
मी असतो तुझ्याच मागेपुढे
तुझा हात धरून हाती
चालतो स्वप्नामध्ये खूप.
आज तुला कळली राणी
माझ्या प्रेमाची अनुभूती
तुझ्या सारखे प्रेम करणारे ,
मोजण्या एवढे फक्त बोटांवर
पहा थोडीच वाट आता
मी नाही जास्त दूर तुझ्यापासून
जेव्हा जेव्हा म्हणशील तेव्हा
धावत येईन मी निरंतर ....