आज उदास वाटे रात ,
कुणीतरी खोल खोल वार केला काळजात
स्वप्न कधी खरे नसते, हे सत्य उमगले आज
पाण्यावरती वाळूचा पूल बांधणे खोटे
झगमगणारे मृगजळ जितके पाण्यापुढते थिटे
कुणी कसे आहे याचा जेव्हा आपणास थांग लागतो
आकाशातून धरणीवरती आपण क्षणात आपटतो
कुणी वाटावा सरळ साधा , वक्रतेने मारून जातो
मनोरम गोड स्वप्नांना ,क्षणात जाळून काजळी बनवतो
मैत्रीच्या मुखवट्यातून एक अघोरी खेळ खेळतो
माणुसकीला मुळापासून उखडून टाकतो
एक अंतरी कळ उठवून जातो
सोनाली
खूप स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत
ReplyDeleteस्वप्न भंगाच्या व्यथा आपण ह्या कवितेतून !
कधी कधी अशा स्वप्नांस नकळतपणे किंवा जाणूनबुजून
आपणच खतपाणी घालतो व वर्तमान काळाची जाणीव झाल्यावर
आपल्याच लक्षात येते कि,
अरे आपण हे काय करतो आहे ?
आपलेच मन आपल्याला खत असते व
लगेच आपण त्या स्वप्न दाखवीणारयास दोष देऊन मोकळे होतो व
जगास दर्शवित जातो कि त्या व्यक्तीने आपणास कसे फसविले !
असो, तुमची कविता खूप सुंदर आहे.