Wednesday, February 9, 2011

काय असे हे काय असे ?


काय असे हे काय असे ?
(प्रेमात पडलेल्या पण प्रेम व्यक्त न करू शकलेल्या  व्यक्तीचे मनोगत)

काय असे हे काय असे ?
जग हे आज मला पायदळी दिसे
कोणी काही बोलले तरी पटकन मला उमगत नसे
पुन्हा पुन्हा मी हे काय  करतो ,काही मला कळत नसे
नेहमी एवढा बोलणारा मी आज इतका शांत असे.

काय असे हे काय असे?
कुठलाही येवो जरा पायरव की येवो कोणाचा फोन
फक्त तुझ्याच येण्याचा विचार मी करतो सतत हरपून
दिसे तू समोरी आणि शेजारी, कधी कधी तर स्वनांतरी
भान नाही कसले मला काही न सुचे जगदांतरी

काय असे हे काय असे ?
 जराही कुणाशी बोलू नये ,  गुजगीत गावे तुझे नवे
घेऊन स्वप्नी कुशीत तुला ,उशीलाच मग कवळावे
कसे सांगावे तिला असे ,प्रेम खरे मी करतो जसे
समजून घेईल का  ती कधी मला, या चिंतेतच  व्हावे वेडे पिसे

सोनाली जोशी लिखितकर

No comments:

Post a Comment