Wednesday, February 9, 2011

कालचक्र


कालचक्र 
आता निवांत एकांती बसताच
झटकन फिरते कालचक्र
आठवतात त्या आठवणी..............

होते एक बालपण
हट्ट करण्याचे , रडण्याचे
आईला बिलगण्याचे .........

होते एक विचित्र वय
शाळेतले ,मित्र मैत्रिणींचे ,
न कळत्या हूर हुरीचे ...............

धावत आले तारुण्य ..
गोड स्वप्ने जागवत
आरशात निरखत ,स्वतःचे अस्तित्व ...............

आंब्या वरी फुलाला मोहर
नंतर उमलली नवी फुले
आनंदाने वर्षे सरली, अजाणता,..............

दबकत झालो प्रौढ ,थोडे अनुभवी
नको म्हणता केस झाले रुपेरी
नवीन म्हणता जुने झालो ..............

म्हातारपण नाकारत मनाने
दिवसा दिवसांनी म्हातारपणात गेलो मुरत
अचानक झाली गम्मत .......

अनेक वर्षे गेली मागे
 पुन्हा लहान झालो मी
ओल्या डोळ्यांच्या कडा पुसत ...................

आठवणी जागवत
स्वप्नांच्या निळ्या पांघरुणाखाली
लहानपणच्या खट्याळ खोड्या पुन्हा करण्यासाठी..................................

 सोनाली जोशी लिखितकर

No comments:

Post a Comment