Thursday, February 10, 2011

माझ्या कृष्णा

माझ्या कृष्णा
तू माझा फक्त ना रे  
 किंवा  मला तरी तुझी म्हण ना
 रोज एकदा तरी माझा 
 हात हातात घेना.
तुझ्या  मुलायम  पिताम्बराचा 
 एकदा तरी स्पर्श  होऊ  दे  ना,
कुठे  तरी जाताना  मला एकदा 
 सोबतीला  तरी घे   ना .
 मीच  तुझी सारखी  आठवण  काढते  
तू   माझी  एकदा  तरी  काढ  ना ,
 हो तुला खूप आहेत कामे 
 माझ्या हून खूप प्रेम करणारे  भक्त आहेत रिकामे .
 तुझे आणि त्यांचे भक्तीचे,
हितगुज सारखे चालते .
 पण मग एकदा तरी आर्त प्रेम करणारीला
तुझे मन काय म्हणते .
 रोज रोज अशी त्याच्यावर 
 मी फक्त रागवतच असे ,
 स्वप्नध्यानामध्ये  मात्र 
 त्याच्या जवळ जवळ असे.
 वाटे मी कस्पट माझे ते प्रेम काय 
 उगीचच स्वतःच्या  प्रेमाचा 
 मी वाजवला डंका
अशीच हळूच खिन्न होत,
  पाहू लागले तुझे रूप
 तर काय ........
तो म्हणाला आज तुझी आठवण आली  खूप 
 तुझ्या लाडेलाडे   रागामध्ये
मी असतो तुझ्याच मागेपुढे  
तुझा हात धरून हाती
 चालतो स्वप्नामध्ये खूप.
आज तुला कळली राणी
 माझ्या प्रेमाची अनुभूती 
 तुझ्या सारखे प्रेम करणारे  ,
मोजण्या एवढे फक्त बोटांवर
 पहा थोडीच वाट आता  
 मी नाही जास्त दूर तुझ्यापासून 
 जेव्हा जेव्हा म्हणशील तेव्हा 
 धावत येईन मी निरंतर ....

1 comment:

  1. कृष्ण प्रेमात वेड लागलेल्या राधेचे चित्र
    डोळ्यासमोर उभे राहते तुमची हि कविता वाचून !
    सुंदर लिहिली आहे तुम्ही हि कविता,आवडली !!
    प्रेमा मध्ये राधे सारखा विश्वास सुद्धा असावा लागतो !
    वास्तविक राधेपासून कृष्ण नेहमीच दूर असतो,
    कित्येक सख्यांबरोबर पत्नींबरोबर असतो
    पण राधेला खात्री असते कि कुणाबरोबर व कुठेही
    माझा कृष्ण असला तरी त्याचे खरे आंतरिक,
    आत्मिक प्रेम हे फक्त राधे वरच आहे!
    हल्ली असे प्रेम मिळणे,
    प्रेमावर असा दृढ विश्वास असणार्या राधा मिळतात कुठे ?

    ReplyDelete