Tuesday, June 14, 2011

एक थेंब त्याचा ओला

एक थेंब त्याचा ओला
 
थेंब थेंबा मागुनी आला
झंकारली   सतार  हृदयात
पाऊस पाहुनी घन विभोर  
मयूर पंखांचेही झाले  गीत
 
थेंब ओघळताना पाहून  
तुझी आठवते हनुवटी ओली
आम्र वृक्षाला कवळून 
लगटली सायलीची वेली  
 
कोवळ्या उन्हात पावसाला
वाटते मीच इंद्र धनु व्हावे
त्या थेंबांच्या हिंदोळ्या वरून
सप्तरंग होऊन जावे
 
पाऊस थांबतो जरासा
माळरानी सुस्तावतो
कात टाकलेल्या नागीणीला
थेंब  थेंबी  भिजवतो
 
पाऊस जातो त्याच्या  घरी 
पानोपानी  होते हिरवाई 
टपोऱ्या थेम्बांवर लोलक
गातात जलतरंग अंगाई
 
सोनाली जोशी लिखितकर
 
 
 
 
 
 

Friday, May 20, 2011

भरून आलं आभाळ ...

भरून आलं आभाळ ...
 
काल दुपारी अचानक आभाळ भरून आलं.
मातीचा मृद गंध मनामध्ये भरून गेलं
पाऊस सुद्धा थोडा थोडा तेव्हा पडत होता
मनालाही तेवढाच आधार पुरेसा होता
काय माहिती कसे आहे ,पण पावसाचे आणि आठवणींचे नाते मात्र जुने आहे
 
तेव्हा सुद्धा आभाळ भरून आलं होत
पाऊस तिला बिलगला तेव्हा मन वेड झाल होत
पावसाचा त्या वेळी हेवा वाटला होता
पण छत्री तिला देऊन मी मोका साधला होता
काय माहिती कस आहे पण पावसाचे आणि छत्रीचे नात सुद्धा जुनं आहे
 
छत्री परत देताना ती रुमाल विसरली होती
मी रुमाल परत करताना सोबत चहा प्यायली होती
चहा पिताना म्हणली आता नंतरचा चहा मी देणार
यातच कळला मला, तिने मला दिला होता होकार
काय माहिती काय आहे पण चहाचे आणि मैत्रीचे नाते मात्र जुने आहे
 
चहा पिताना एकदा म्हणली तू खूप छान आहेस
तुझे वागणे सुद्धा आरशासारखे लखलखीत आहे
माझ्या वडिलांना  सुद्धा असाच  हवाय जावई
चालेल पुण्यातला किंवा चालेल सुद्धा मुंबई
काय माहिती काय आहे पण मुंबई पुण्याचा जावई सासर्याना नेहमीच  हवा आहे
 
खूप दिवस प्यालो चहा पण आमची गाडी मात्र जाईना पुढे
काय विचारू कसे विचारू ,जाईना  पुढे  आमचे घोडे
एक दिवस धीर करून तिला विचारीन म्हणले
तर तीच आधी म्हणाली तुझ्यासारखे मित्र असतात थोडे
काय माहिती काय आहे ,पण तुझे माझे नाते मात्र वेगळे आहे
 
काल मी पहिला आहे एक मुलगा
आई वडिलांना सुद्धा तो पसंत आहे बर का
मला पण वाटतोय नवरा म्हणुन बरा
नोकरी आहे कायम ,घर आणि पैसा .
काय माहित काय आहे पण ही आपली शेवटची भेट आहे
 
अजून मला आठवतेय ती भेट
अजून मला आठवतोय तो पाऊस
तेव्हा सुद्धा तो पडताच होता
माझ्या डोळ्यातले अश्रू स्वतःत मिसळत होता
काय माहिती काय आहे पण पावसाचे आणि दुःखाचे नाते मात्र जुने आहे .
 
सोनाली जोशी लिखितकर  .
 
 
 
 
 
 
 

संधिकाल

संधिकाल
संध्याकाळ पाहताना कसं वाटत उदास ..
प्रत्येक संधी होताना ,अस काय होत मनास
एकटेच पाहतो जेव्हा  ,घरट्यात परतणारे पक्षी
एकलकोंड्या आभाळावर सुद्धा उमटते काही काल नक्षी 
मन होत वेडं,  काहीतरी होतं खोल खोल आत
काय माहित  पण ,संध्येच्या  उदरात एक रहस्य दडलंय खास  
सोनाली
 

सहजच

सहजच
रात्र घनभोर अशी , तुज आठवताना
चंद्र ही आला , माझ्या सोबतीला
गार वारा थिजवतो ,काळीज माझे
पाहून शशी मग ,पांघरतो त्याचे चांदणे .
गीत मन भावन ऐकताना सुरंगी
चित्त माझे बनून गेले नटरंगी

भेट

भेट
काय लिहू सखये तुला आज तुझी आठवण आली
वाटले होते भेटावे एकदा तुला पण कामे माझी आडवी आली
जरी दूर देशी असलो तरी येतो तुझ्या देशी भेटण्याला
भेट झाली नाही तुझी म्हणुन काय झाले ?
तुझ्या गावीचा मी झेलतो अंगावर वारा
त्या वाऱ्यालाच  पाठवीन मी माझे मनोगत
लिहीन कधीतरी एकदा मी सुद्धा मेघ दूत
सोनाली लिखितकर

Monday, March 7, 2011

मी आजची माता............


मी आजची माता............

परवा सहज मनी आला विचार
त्या विचाराने मला ,केले फार बेजार,
मुलांना माझ्या लागलंय कॉम्पुटरचे  वेड
न्याहारीला हवाय फक्त बटर आणि ब्रेड||

रविवारी संध्याकाळी , हवाय पिझा आणि बर्गर
मेक डोनाल्ड ,पिझा हटने केलंय मला जर्जर
टी.व्ही .,कॉम्पुटरच्या  उरल्या वेळात ,मुले करतात अभ्यास
अर्ध्या तासात त्यांचा अभ्यास  होतो खलास

आई म्हणाली  माझी  ,त्यांच्या वेळी नव्हती अशी चैन
नव्हता घरात साधा पंखा,  होते चिमण्या आणि कंदील ,
लाड अजिबात नव्हते, माय बाप देवासमान
म्हणुन सर्व मुले झाली इंजिनिअर ,डॉक्टर छान

मी विचार केला ,मुलांना मी फार सोडलाय सैल
म्हणूनच तर  अभ्यासात होऊ लागलीयत बैल
एक दिवस सोडलं ,मी घरात फर्मान
आजपासून बंद बर्गर पिझा ,घरीच जेऊ छान

कॉम्पुटरला हात लावायचा नाही कुणी
टी .व्ही. बघायचा थोडा वेळ ,खेळायची भेंड्या गाणी
गम्मत म्हणुन एक दिवस, तर लाईटही बंद केले
मेणबत्तीच्या प्रकाशात मुलांना धडे शिकवले

मुले बिचारी घाबरली ,कावरी बावरी झाली
डासांनी तर आमची मेजवानीच उडवली
हात पाय लाल झाले ,अंधारात अडखळून पडले
मुलांना व्यस्त ठेवता ठेवता ,डोके गरगरू लागले

रोज रोज स्वयंपाक करून मी खूप थकून गेले
आई मी काय करू ? ऐकून ऐकून वेडी झाले
शेवटी एक दिवस मी पत्करली शरणागती
सर्व नियम सोडून ,मुलांना घेऊन गेलो पिझा हटी......

सोनाली जोशी लिखितकर

धुंद





धुंद  ढगाळ  पडली  हवा,  धुंदीत  माझे  चालणे

 धुंदीत  बोल बोलताना,  खुदकन  स्वतःशीच  हसणे

 चंद्राच्या  रात्रीत  माझ्या , जसे  तुझ्या  सवे  चालणे

 आठवत  राहते  सारखे,  तुझा  हात  हातात  धरणे ||
 
 नि:शब्द  शब्द  बोलताना , ओठांचेच  अडखळणे

 स्वप्नांच्या   हिंदोळ्यावर , जसे  नील पक्षाचे  झुलणे

 काळवेळ  माणसांचा  मला  विसर  पडतो  आहे

  मागे  मागे  खूप  मागे,  माझे  वय  गेले  आहे ||

 सांग सखे  बोल  सखे , काय  बोलायचे  आहे ?

 किती  वेळा  विचारशील  मला?  तुला  काय  ऐकायचे  आहे?

 दोघे  दोघे  जेव्हा  होतात  एक , तेव्हा  बोलण्या  सारखे  नाही  राहत

 स्पर्श  हाताचा  स्निग्ध  उष्ण , सांगून  जातो  लगेच  तत्क्षण ||

 एक   मात्र  आहे  आता,  एक  विश्वास  मनी  आहे

 माझ्या  करता  एक  तरी , आज  अजून  तेथे  आहे .

 माझ्या करता एक तरी आज अजून तेथे आहे.||

सोनाली जोशी लिखीतकर 




<

Thursday, February 10, 2011

माझ्या कृष्णा

माझ्या कृष्णा
तू माझा फक्त ना रे  
 किंवा  मला तरी तुझी म्हण ना
 रोज एकदा तरी माझा 
 हात हातात घेना.
तुझ्या  मुलायम  पिताम्बराचा 
 एकदा तरी स्पर्श  होऊ  दे  ना,
कुठे  तरी जाताना  मला एकदा 
 सोबतीला  तरी घे   ना .
 मीच  तुझी सारखी  आठवण  काढते  
तू   माझी  एकदा  तरी  काढ  ना ,
 हो तुला खूप आहेत कामे 
 माझ्या हून खूप प्रेम करणारे  भक्त आहेत रिकामे .
 तुझे आणि त्यांचे भक्तीचे,
हितगुज सारखे चालते .
 पण मग एकदा तरी आर्त प्रेम करणारीला
तुझे मन काय म्हणते .
 रोज रोज अशी त्याच्यावर 
 मी फक्त रागवतच असे ,
 स्वप्नध्यानामध्ये  मात्र 
 त्याच्या जवळ जवळ असे.
 वाटे मी कस्पट माझे ते प्रेम काय 
 उगीचच स्वतःच्या  प्रेमाचा 
 मी वाजवला डंका
अशीच हळूच खिन्न होत,
  पाहू लागले तुझे रूप
 तर काय ........
तो म्हणाला आज तुझी आठवण आली  खूप 
 तुझ्या लाडेलाडे   रागामध्ये
मी असतो तुझ्याच मागेपुढे  
तुझा हात धरून हाती
 चालतो स्वप्नामध्ये खूप.
आज तुला कळली राणी
 माझ्या प्रेमाची अनुभूती 
 तुझ्या सारखे प्रेम करणारे  ,
मोजण्या एवढे फक्त बोटांवर
 पहा थोडीच वाट आता  
 मी नाही जास्त दूर तुझ्यापासून 
 जेव्हा जेव्हा म्हणशील तेव्हा 
 धावत येईन मी निरंतर ....

असाही एक माणूस

 
आज   उदास  वाटे रात ,
कुणीतरी खोल खोल वार केला काळजात
स्वप्न कधी खरे नसते, हे सत्य उमगले आज
पाण्यावरती वाळूचा पूल बांधणे खोटे
झगमगणारे मृगजळ जितके पाण्यापुढते थिटे
कुणी कसे आहे याचा जेव्हा आपणास थांग लागतो
आकाशातून धरणीवरती आपण क्षणात आपटतो
कुणी वाटावा सरळ साधा  , वक्रतेने मारून जातो
मनोरम  गोड स्वप्नांना ,क्षणात जाळून काजळी बनवतो
मैत्रीच्या मुखवट्यातून एक अघोरी खेळ खेळतो
माणुसकीला मुळापासून उखडून टाकतो
एक अंतरी कळ उठवून जातो
                  सोनाली
 

Wednesday, February 9, 2011

काय असे हे काय असे ?


काय असे हे काय असे ?
(प्रेमात पडलेल्या पण प्रेम व्यक्त न करू शकलेल्या  व्यक्तीचे मनोगत)

काय असे हे काय असे ?
जग हे आज मला पायदळी दिसे
कोणी काही बोलले तरी पटकन मला उमगत नसे
पुन्हा पुन्हा मी हे काय  करतो ,काही मला कळत नसे
नेहमी एवढा बोलणारा मी आज इतका शांत असे.

काय असे हे काय असे?
कुठलाही येवो जरा पायरव की येवो कोणाचा फोन
फक्त तुझ्याच येण्याचा विचार मी करतो सतत हरपून
दिसे तू समोरी आणि शेजारी, कधी कधी तर स्वनांतरी
भान नाही कसले मला काही न सुचे जगदांतरी

काय असे हे काय असे ?
 जराही कुणाशी बोलू नये ,  गुजगीत गावे तुझे नवे
घेऊन स्वप्नी कुशीत तुला ,उशीलाच मग कवळावे
कसे सांगावे तिला असे ,प्रेम खरे मी करतो जसे
समजून घेईल का  ती कधी मला, या चिंतेतच  व्हावे वेडे पिसे

सोनाली जोशी लिखितकर

कालचक्र


कालचक्र 
आता निवांत एकांती बसताच
झटकन फिरते कालचक्र
आठवतात त्या आठवणी..............

होते एक बालपण
हट्ट करण्याचे , रडण्याचे
आईला बिलगण्याचे .........

होते एक विचित्र वय
शाळेतले ,मित्र मैत्रिणींचे ,
न कळत्या हूर हुरीचे ...............

धावत आले तारुण्य ..
गोड स्वप्ने जागवत
आरशात निरखत ,स्वतःचे अस्तित्व ...............

आंब्या वरी फुलाला मोहर
नंतर उमलली नवी फुले
आनंदाने वर्षे सरली, अजाणता,..............

दबकत झालो प्रौढ ,थोडे अनुभवी
नको म्हणता केस झाले रुपेरी
नवीन म्हणता जुने झालो ..............

म्हातारपण नाकारत मनाने
दिवसा दिवसांनी म्हातारपणात गेलो मुरत
अचानक झाली गम्मत .......

अनेक वर्षे गेली मागे
 पुन्हा लहान झालो मी
ओल्या डोळ्यांच्या कडा पुसत ...................

आठवणी जागवत
स्वप्नांच्या निळ्या पांघरुणाखाली
लहानपणच्या खट्याळ खोड्या पुन्हा करण्यासाठी..................................

 सोनाली जोशी लिखितकर

तू मला पाहीले


तू मला पाहीले अन मी तुला
मी तुला पाहीले अन तू मला

तू मला पाहताच मी वळवते मान
मी तुझ्याकडे पाहताच तू वळवतोस  मान

चोर  चोरुनी पाहणे  आणि हृदयाचे धड धडणे
कारणे काढून फुकाची ,तुज जवळून जाणे

एकमेकांच्या डोळ्यात दिसली जरी तीच प्रतिमा
सांगता येत नाही ,फक्त लपत नाही लालिमा

रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र
जोवरी तुला कळत नाही तोवरी हेच सत्र

कधी होशील माझा तू स्वप्नातील राजा
स्वप्नात फिरायचे आहे तुझ्याच,  हाती धरुनी हात माझा

सोनाली जोशी लिखितकर 

Friday, February 4, 2011

लाइफ लाईन

लाइफ लाईन

दिसता तू मला
मनी पसरले चांदणे,
बोलता दोन शब्द माझ्याशी
जशी रुण झुणली पैंजणे.

पण माझ्या मनीचे राणी
सांगता येत नाही,
तू समोर येता
 बोलतो दुसरेच काही.

एकांती मी असता
असतात तुझ्याच स्मृती,
आता कशातच मला
वाटत नाही तृप्ती.

इतर प्रेमीजनांना
मी पूर्वी म्हणे वेडे,
पण माझ्या प्रेमाचे
मात्र आता  पडले कोडे.

तू ऑन लाईन असता
जसा मी चार्ज होतो,
तू ऑफ लाईन असता
जिंदगीचा चार्म जातो.

तुझ्या येण्या जाण्यातच
जातात रात्रंदिन,
कधी बनशील का ग
माझी लाइफ लाईन .........

सोनाली  लिखितकर

Monday, January 31, 2011

तुझ्या येण्यान होतं

तुझ्या येण्यान होतं  
मन बावरं  बावरं,
जशी वाऱ्यावर जाते
उडुनी सावर सावर ...
तुझ्या बोलण्याचा गुंजारव 
मी होते कमला पंकज,
स्पर्श होइल कधी तुझा 
आधीच होते लाजाळूच  पान.....
पाहशील मला चोरुनी 
म्हणुनी आधी  मिटले  नयन ,
स्वप्नात  कवळशील म्हणुनी
निद्राही दिली सोडून  ......
तू आलास भेटाया
तर जाशी एकटीला सोडून,
म्हणुनी भेटत नाही तुला
राहते मनातच केवळ तुझे  ध्यान ........
सोनाली जोशी लिखितकर
 

Thursday, January 27, 2011

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी
जागवून माझिया मनी, आकाश तारकांचा शृंगार
प्रेमाचे घातलेस  हृदयी ,अनामिक तू हुंकार
तुझा शब्द ऐकण्यासाठी ,तरसवले मला फार
तुझ्या सवे वाहून नेले, जशी सागराला भारती अपार||
तू सागर होता, मी  झाले चंद्र
तू सागर होता ,मी झाले सरिता
चंद्र होऊनी  पृथ्वी जवळी आले
सरिता होऊनी स्वतःस मिटविले ||
नाही राहिले माझे काही, आता जिवा पार
अशात कसे रे ,दूर केले मला वारंवार
इतके सोपे असते का रे ,येऊनि  जाणे दूर
कुणाच्याही हृदयाला करणे एक चीर ||
काय करू आता जगण्यास अर्थ नाही
कशात ,कुणात आता, रसच वाटत नाही
आहे मनामध्ये माझ्या, धगधगती एक ज्वाला
पण राहीन तुझ्या मंदिराबाहेरी ,बनून दीप माला
..........................बनुनी दीप माला
सोनाली जोशी लिखितकर

Tuesday, January 25, 2011

पाऊल टाकू पुढे

पाऊल टाकू पुढे
आज टाकले पुन्हा एकदा माझे पाऊल पुढे .
पुरंदरच्या शिवदुर्गावर ,भवताली सह्याद्रीचे कडे
किती दिसांची आस मनी ,पाहावा हा किल्ला
किती गेले रविवार सांगू ,जाणे होईना मला 1.
चढू लागले धापा टाकत किल्याची अवघड वाट  
कधी टोचली मज करवंदीची जाळी घनदाट, 
कधी घसरले पाऊल कधी खरचटले कोपर
तेव्हा  दिसले महाद्वार किल्याच्या बाहेर.
मन माझे थर थरू लागले  पायांच्या बरोबरी
पोचले शिवरायांच्या काळात मी तत्परी,
असेन का मी एखादा मावळा मराठी तरी
की असेन एखादा नोकर  राजांच्या खातिरदारी.
कधीतरी  पडले असेल का  माझे पाऊल या  दगडावरी  
जरी  नसेल यातील कुणी तरी नक्कीच असेन राजांचा श्वान,
टाकुनी उडी चितेत त्यांच्या माझ्या कुळाचा वाढवीत मान
घुमली  असतील इथेच बाजीप्रभूंचे तलवारींचे खण खण  
जेव्हा स्वराज्याकरिता त्यांनी सोडले पावनखिंडीत प्राण 
विचारा मध्ये गुंगून गेले ,अंगामध्ये  चढले स्फुरण
पण आता मी काय करणार , कुणाविरुद्ध पुकारू रण
धारदार करारी आला आवाज शांती भेदून
बाळा अजूनही नाही मिळाले स्वराज्य आपणा
अतिरेकी ,भ्रष्टाचारी आता आहेत आपल्याला वेढुन
उभी ठाक या सर्वाशी लढाया कंबर कसून 
सर्व मित्रमैत्रिणीना दे   या साठी आमंत्रण 

Monday, January 24, 2011

अबोला

अबोला
तु का अबोल इतका आज
का आज सख्या इतका शांत तू
कि आतून ढवळून निघालास   तू
म्हणून हे कोशात जाऊन  बसलास तू
रित्या मनात दुसरे काही भरेना 
खरेच आज तुझ्या विना करमेना 
वाट पाहून तुझ्या निरोपाची
कशातही  मन लागेना
जेवण लागेना गोड
काम हाताचे जसे यंत्र-जोड
आज का रागावला मित्र
निदान यावे एखादे पत्र
मी त्याची काढावी समजूत
आणि काढताना ती रागवावे स्वतःच
आता फक्त एक उपाय
त्याची पहावी मी वाट
पण हे फार अवघड असते
क्षणाक्षणाने जळणे असते